आई
आई
झाली ती बेभान
जीवाचा केला रान
ईश्वर आपणासाठी अमूर्त
पण तिच आम्हा मूर्त
नयनी तिच्या लेकरांसाठी खूप स्वप्न
म्हणूनी आयुष्यभर करते ती प्रयत्न
कुणीही घेऊ शकत नाही तिची जागा
तिच वाढू शकते लेकरांना घेऊनी त्रागा
म्हणून लेकरांनो कोणत्याही परिस्थितीत जगा
नका देऊ उगाच नैराश्येत जीव
करा आपल्या आईवरती किव
खंबीर ठेवा आपलंं मन
शेवटी मिथ्याच आहे हे धन
करा थोडं प्रतिकूल परिस्थितीतही समायोजन
मग नक्कीच लागेल पुढचं नियोजन
नका देऊ लक्ष की, काय बोलते जन?
फक्त सांभाळा आपलं तन
