STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Inspirational

3  

Ramkrishna Nagargoje

Inspirational

आई जिजाऊ

आई जिजाऊ

1 min
312

कारुण्याची मुर्ती तू,

प्रेमाचे गीत तू,

रत्नाकराची लाट तू

आकाशाची उंची तू,

पोर्णिमेचे चांदणे तू,

आई माझी.


मेघाची धार तू,

पूर्वेचा सुर्य तू,

आद्यगुरु तू,

ज्ञानाचे विद्यापीठ,

ऋषींचा त्याग तू,

आई माझी.


काट्यावर शय्या तुझी,

हासरे फूले तू,

फुलातला सुगंध तू,

फुलांची बाग तू,

आई माझी.


झोपेची अंगाई तू,

गीत तू,सप्तसुरांची

लय तू

देवाचींही, जननी तू,

राम कृष्ण तुझे उदरी,

कौश्यल्या तू, देवकी तू 

विरांची भारतमाता,

आई माझी.


मायबोली मराठीचा,

आधार तू,

मराठीची प्रतिभा तू,

राजमाता तू,वीरश्री तू,

छत्रपती शिवबाची,

माता तू,

जननी महाराष्ट्रची तू

जिजाऊ तू,

माझी आई.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational