STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

आई ( अष्टाक्षरी रचना )

आई ( अष्टाक्षरी रचना )

1 min
534

स्पर्धेसाठी


आई

( अष्टाक्षरी रचना )


जन्म देते लेकराला

तेच विश्व तिचे होते

विसरते दुःख सारे 

बाळा पाहता हसते


लहानाचा मोठा करी

माया होत नाही कमी 

लेकराच्या हास्यासाठी 

उभी राहते नेहमी


बाळा केला काही हट्ट 

आई पुरवी लगेच 

स्वतः राहील उपाशी 

तरी गाली हसतेच


तिच्या असल्याने पहा 

घर वाटे भरलेले 

तिच्या नसल्याने जणू 

घर खायला उठले


आई पडता अजारी

घर उदास भासते 

आई घरासाठी श्वास 

नव चैतन्य असते


आई होणे सोपे नाही 

हवी त्यासाठी पुण्याई 

भाग्यवंत ती लेकरं

ज्यांना मिळते हो आई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational