आई अंबाबाई
आई अंबाबाई
आई माझी अंबाबाई
शालू हिरवा नेसली
मोठ्या थाटात माऊली
कशी मंचकी बसली ।।१।।
भाळी लाल मळवट
चुडा हिरवा हातात
कुंकू भांगात भरले
नथ शोभते नाकात ।।२।।
पाही महिषासुराला
क्रोध भरे अतोनात
डोळे अंगार ओकती
शक्ती संचार अंगात ।।३।।
त्रस्त देवता, जनता
होता राक्षस मातला
दैत्य मर्दन करून
मुक्त केले जनतेला ।।४।।
नऊ दिवस चालते
भक्ती भावाने पूजन
तुझ्या नावाचा जागर
भक्त करती नेमानं ।।५।।
उदो उदो अंबाबाई
भक्ता आशीर्वाद देई
हाक भक्ताची येताच
माते धाऊनिया येई ।।६।।
