आई ( अभंग रचना )
आई ( अभंग रचना )
आई
( अभंग रचना )
बाळास धरते | आई ती छातीशी I
मिळते ती खुशी I दोन्ही जीवा ॥ १ ॥
तान्हुल्या बाळाला | स्पर्श हवा हवा I
निवांत झोपावा | थोपटता ॥ २ ॥
आईचा तो जीव | जीव तो ओतला |
असा वाढविला | उदारात ॥ ३ ॥
बाळंतपणात | बाळ किंवा अंत |
आस ती धरत I बाळासाठी ॥ ४ ॥
मातृत्व मिळवे | हिच असे आशा I
नसावी निराशा | पदरात ॥ ५ ॥
किशोर झोटे,
औरंगाबाद
