आई आहे मी भाग्यवान
आई आहे मी भाग्यवान
आई आहे मी भाग्यवान
वीर पुत्र जन्मला पोटी
जन्मोजन्मी भवानी माते
याच पुत्राने भरु दे ओटी-1
भगत माझा पुत्र पराक्रमी
सॉंडर्स अधिकाऱ्यावर झाडली गोळी
अन्याय करतयावर वचक बसण्या
इंग्रज अत्याचाराची केली होळी-2
धगधगते रक्त मम पुत्राचे
जुलमी विरुद्ध उठले पेटून
वीर जवान शहीद जहाला
23व्या वर्षी फासावर लटकून-3
क्रांतिकारी हिरा माझा
आहे मला अभिमान
शौर्याने त्याच्या सदैव
उंचावते माझी मान-4
