STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

आग...!

आग...!

1 min
178

आग......!


आग ओकते धरणी माता

नका छेद करत

जाऊ आता पोटात...


तिच्याच ओठी

नाही उरले पाणी

नका खोदू ऐटीत...


पाण्या साठी

मार्ग सुलभ  

अन खात्रीचा एक...


पाणी आडवा

पाणी जिरवा

आपल्याच शिवारात...


आजचे पाणी

मुरेल चांगले

वाढविल भूजल पातळी...


सर्व मिळूनी

विडा उचलूनी निर्माण करा

गावोगावी शेततळी...


येणार नाही 

तुमच्यावर कधीच

अशी जीवघेणी पाळी...


झाडे लावून

झाडे जगवून

भरू प्रत्येक वर्षी तळी...


मुबलक पाऊस होता

सुजलाम सुफलाम

होईल आपोआव आळी...


नाद सोडून 

बोअर वेलचा

निर्मूया शेत तळ्यांची जाळी...


नांदेल प्रत्येक

शिवारात तो

पालन हार वनमाळी....!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

prashants9606@gmail. com

8007740679



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational