STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आदर्श संविधान

आदर्श संविधान

1 min
177

भारताचे संविधान, डॉ. आंबेडकरांनी लिहिले

भारतमातेच्या शिरी, शिरपेचचि खोविले    (1)


स्वातंत्र्योत्तर काळात, सर्वसमावेशकता

अवघडचि काम होते, लिहिणे अशी संहिता   (2)


विद्वान, ज्ञानी, व्यासंगी, कीर्ती असे साहेबांची

समतोलपणे लिहिली, रचना संविधानाची   (3)


मुलभूत हक्कांचे, विवेचन यात केले

कर्तव्यांची बाजूही, नमूद केली असे    (4)


राज्यसरकार नि केंद्रशासन, व्यवस्थापनाचे

कायदे नमूद केले, संविधानामधे लोकशाहीचे (5)


राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, नियम नियुक्तीचे

कलमांमध्ये नमूद केले, ह्यांच्या निकष पात्रतेचे  (6)


तळागाळातील लोकांचांही, सहानुभूतीने विचार केला

राखीव जागा ठेवून, तयांच्या विकासास वाव दिला  (7)


अनेकविध बाजूंचा, बहुपेडी विचार, दूरदृष्टीने केला

भारतीय नागरिक वंदितो, भारतीय संविधानाला  (8)


भारतीय नागरिकांनी संविधानासी, हक्काने मान द्यावा

पालन करुनी संविधानाचे, कर्तव्यास अग्रक्रम द्यावा  (9)


अनंत उपकार संविधानकर्त्यांचे, मानिले भारतीयांनी

उपकार मनी स्मरताचि, ऊर येई अभिमानाने भरुनी  (10)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract