STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational

3  

Murari Deshpande

Inspirational

आदरणीय सुषमाजी.....

आदरणीय सुषमाजी.....

1 min
353

शांत जाहली धडाडणारी तोफ अचानक आज

वक्तृत्वाचा जणू धबधबा शालीनतेचा साज

भल्या भल्यांना वेळोवेळी सुनवीत बोल खडे

देशहिताच्या समोर काही मानलेच ना बडे

होऊनी दुर्गा सहज फाडले देशद्रोही किती

राष्ट्राच्या या अखंडतेवर सदैव केलीत प्रीती

राजनीतीतील सोज्वळ चेहरा आयुष्य निर्मळ साफ

कार्याचा तर असा झपाटा केवळ वारेमाप

जीवन अवघे सहज वेचुनी आपल्या देशासाठी

‘सुषमा’ गेल्या चुटपुट लावून ‘स्वराज’ ठेवून पाठी

संस्कृतीचे ते रूप बोलके कुंकुम झळके भाळी

किती सहजता मृत्यूला अन देतानाही टाळी

नजरेपुढूनी मुळी हलेना अजुनी त्यांची मूर्ती

श्वास मोजला हरेक करण्या कर्तव्याची पूर्ती

कधी कुणाची बहिण झाल्या वेळप्रसंगी आई

मात्र सांगतो केलीत खूपच जाण्याचीही घाई

संसदेतही घुमत राहतील वाघीणीचे उद्गार

प्रखर प्रभावी शब्दांना त्या समशेरीसम धार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational