STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

आधुनिक युगातील स्त्री मी.

आधुनिक युगातील स्त्री मी.

1 min
304

वादळं आली किती जरी

पाय रोवून घट्ट उभी मी

हलणार नाही जागची

आधुनिक युगातील स्त्री मी ..


फसवण्यास मला, मांडला डाव

सवय आहे मला याची

शह देऊनी उभी राहते

आधुनिक युगातील स्त्री मी


वाटेवरती दिसतात दुर्योधन

नाही घाबरत आता यांस मी

स्वसंरक्षण करण्या सज्ज आता

आधुनिक युगातील स्त्री मी


ऑफिस घरकाम नातीगोती

सगळं चतुराईने निभावते मी

आनंदाने करते तारेवरची कसरत

आधुनिक युगातील स्त्री मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational