Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunita Patil

Inspirational

3  

Sunita Patil

Inspirational

आधारस्तंभ देशाचा

आधारस्तंभ देशाचा

1 min
271


कोवळ्या बाल मनावर

करीती मायेने संस्कार

घडवितो नव्या पिढीस

शिक्षक खरा शिल्पकार..१


करी मूल्यांची रुजवण

नवीन ज्ञानाचे शिंपण

मार्गदर्शन विविधांगी

घडते विद्यार्थी जीवन...२


घडवी मूर्ती नवनवी

मनात नसे दुजाभाव

आधारस्तंभ तो देशाचा

मनी नसे स्वार्थाचा भाव...३


मार्ग दाखवितो नेहमी

तिमिरातूनी प्रकाशात

दूर अज्ञानाचे वलय

देई ज्ञानज्योत हातात...४


स्वप्न भविष्याची पेरतो

नित्य विद्यार्थी जीवनात

घडा सोपवून ज्ञानाचा

यश अवतरे पुढ्यात....५


नवनवीन तंत्रज्ञान

नित्य करूनी आत्मसात

नांदी नव्या यंत्र युगाची 

घाली विद्यार्थी पदरात...६


यश शिखरे सर होती

संस्कारीत होतसे मन

शिक्षक लाभता चांगले

घडते समृद्ध जीवन....७



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational