STORYMIRROR

Kranti Shelar

Inspirational

3  

Kranti Shelar

Inspirational

भरारी

भरारी

1 min
306

घे उंच भरारी तू या क्षितिजापल्याड

घे उंच झेप या आकाशापल्याड....


तुझा तोल तुच सावर 

तुझ्या मनाला दु:खातही तुच आवर.....


भेदरलेल्या या मनाला उडताना तुच उभारी दे

ओसाड त्या माळरानावर पंख पसरवायची उमेद तुच स्वतःला दे......


कठीण काळातही झेप घेणं सोडू नकोस

उंचावर गेल्यावर मागे नजर टाकायला विसरू नकोस.....


तू घे उत्तुंग भरारी 

कर त्या क्षितिजाला भेदण्याची जोरदार तयारी!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational