मन गुंतवा
मन गुंतवा
नाराज मनाला ओळखून
ठोस आधाराचा खांदा
स्वतःच देऊन बघावा
मनातल्या विचारांचा
एक दोरखंड सैल होताच
दुसऱ्या समाधानाचा हात
घट्ट मिठीत घेऊनि
मन स्वतःत पुन्हा गुंतवा
निराशेच्या गर्दीत न हरवता
आशेच्या उंच मनोऱ्याला
अलगद फुंकर घाला
हळव्या मनाला जपुनी
कठोरतेची माया-सावली
कुशीत घेऊनि बिलगा