STORYMIRROR

R U Salunke

Inspirational

3  

R U Salunke

Inspirational

सहकार्य..

सहकार्य..

1 min
396

सहकार्य कोणी करावे

कोणीही आणि कोणासही करावे

सहज कार्यच ते

त्यात कोणतेच अहंकार नसावे...


सहकार्य कोणास करावे

संकटे आलेली मित्र, नातेवाईक यांना करावे

त्यांचा तो काळ

जाईपर्यंत त्यांना करावे...


सहकार्य कोणास करावे

भुकेले, दु:खी यांना करावे

आपल्यातील दोन घास

देत आपण त्यांना भरावे...


सहकार्य कोणास करावे

ज्यांना पाहिजे त्यांना करावे

त्यांची अडचणी दूर करत

त्यांचे आनंदी स्तर उंच करावे...


सहकार्य कोणास करावे

राष्ट्र निर्मितीसाठी करावे

त्याची शान वाढवत

त्यास जगज्जेता होण्यासाठी करावे...

सहकार्य कोणीही आणि कोणासही करावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational