Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

R U Salunke

Inspirational

2  

R U Salunke

Inspirational

वाया जात नाही

वाया जात नाही

1 min
76



काही तरी हलचाल करू

तेव्हा काही तरी मिळेल

बिना केल्याचे आपले

जीवन तरी कसे फळेल. ... 1


करण्यासारखे खुप आहे

फक्त आपल्याला जमेल, आवडेल

असेच निवडले तर

त्यात पुढचा मार्ग सापडेल... 2


कोणी भरपुर शिकावे

तर कोणी स्पर्धा परीक्षा द्याव्या

आपले पद आपल्या हाती येण्यास

तयारी साऱ्या सज्ज कराव्या. .. 3


जमल्यास व्यवसाय ही

नक्की करून पाहवा.. 

पण काळजीपूर्वक रोज

हिशोब पण पाहत राहवा.. 4


अनेक क्षेत्र आहे

तशा संधी पण भरपूर राहणारच

मनाला खंबीर करत काम केले तर

यश पण नक्की मिळणारच... 5


सतत प्रयत्न हवेच असतात

मध्येच सोडून काही फायदा होत नाही

एकदा नूकसान झाले तर

पुन्हा कधीच भरून निघत नाही... 6


वेळ आणि संंधी यांची सांगड हवी

एकदा गेले की परत येत नाही

आपले कर्म करत जावे

केलेले काहीच वाया जात नाही... 7



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational