विचार
विचार
आनंदी विचार
आनंद देई
जाई नकार
होकार येई... 1
विचारच ती
कधी सारखी पळवे
तर कधी
बनवे हळवे., 2
विचाराअंती
कधी ऊठे खवळून
तर कधी निघे
सारेच ढवळून... 3
आपले विचार
कधी राही करारी
कधी चाले मुक्त
घेई ऊंच भरारी.. 4
बने विचार गुलाम
अविचार येई
जाळे मनाला
सदाचार जाई... 5
शुद्ध विचार
ना मिळे विकत
बिना पाणी ईथे
काही नाही पिकत.... 6
जसे विचार
तसा व्यवहार
आणि तसा
आपला वावर... 7
ताठर विचार
करतात हानी
जवळची दुर जाई
जवळ ना कोणी... 8
स्वार्थी विचार
स्वार्थ च तो पाही
आपल्याच भल्यात
सदा गुंतून राही... 9
सरळ विचार
नुकसान ना काही
पर्वा नसते
मतलब नाही. .. 10
व्यक्त होई विचार
कधी थांबत नाही
चांगले विचार वसे
मनातून जात नाही... 11
धन्यवाद...
