नव तरूण
नव तरूण
भय भिती ती काय त्याला
ज्याने भयावर हल्ला केला...
निघाला तो पुढे जाण्यास
कोणता बांध आडवी त्याला...
तोडल्यात साऱ्या शृंखला
छेदले त्याने त्या वर्तुळाला..
त्या पडक्या भिंती आता
कुठे दम धरतील रोखायला..
नव तरूण तो नवा झाला
नव्या नव्या दिशेने निघाला..
