आठ मार्च
आठ मार्च
विकाशी नारीस आजच्या महिला
गौरव दिनाला आठवूया.... 1
आपले ते हक्क नाकारले जगी
झाली नारी जागी सदासाठी... 2
समतेच्या दारी ना मिळे सन्मान
मिळावा तो मान पदोपदी... 3
अहंकारी सारी आमची व्यवस्था
करी अव्यवस्था नेहमीच... 4
परंपरा माथी आहे चिकटून
कधी ती जाईल एकदाची.. 5
माणसाने आता जरा सुधरावे
सत्य स्विकारावे आदराने... 6
स्त्री आता कधी थांबणार नाही
माघार ती नाही घेई कधी... 7
ना एक दिवस साजरा करावा
वागून दाखवा आचारणी... 8
जन्मास माणसा ना पर्याय काही
कोणीतरी आई जन्म देई.... 9
ती लेक ती आई ती पत्नी, बहिण
प्रेमच देईन साऱ्यांसाठी... 10