STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Inspirational Others

3  

Ganesh G Shivlad

Inspirational Others

आधार कुणाचा..?

आधार कुणाचा..?

1 min
401

रानातील पक्षी अन् प्राण्यांना, 

असतो का रे आधार कुणाचा..?


मग का मागतोस, तू वेड्या असा, 

फसवा आधार कुणाचा..?


राहून झाडावर, उडतात मस्तीत, 

जीवन जगत स्वच्छंदी..!


खाऊन रानमेवा अन् चारा, 

जपतात पिलांना, ठेवून आनंदी..!


आला आहेस, जगात ज्या तू, 

जीवन जगण्यास जोशात..!


मग आता का रडतोस रे तू, 

मागतोस सहारा रोषात..!


दगड होऊन जग तू राजा, 

कुणासमोर नको असा वाकू..!


किती जरी आली संकटे सामोरी, 

नको असा तू डगमगू..!


घे शपथ तू आज इथेच, 

आधार कुणाचा आता, 

मी घेणार नाही..!


कष्ट करून, घाम गाळून, 

आधार कुणाला तरी, 

मी देणार आहे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational