STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

आभाळ

आभाळ

1 min
446


उजळून लख्ख झाले

ज्ञानदिप पाजळला

सावित्रीने लेकींसाठी

गावगाडा बदलला।


कर्तृत्वाला ठेंगणे हे

आज आभाळ नारीला

दशदिशा व्यापकत्व

सृजनत्व विचाराला।


किती आल्या अडचणी

मन,विवेक खंबीर

बाहुबळ जरी कमी

मनोधैर्य ते गंभीर।


वैचारिक वैभवाला

कीर्ती अनोखे कोंदण

आभाळीच्या औदार्याला

ममतेचे उच्च दान।


सोशिकता,आत्मबळ

नारी दयेचा सागर।

माय,कन्या,भगिनीचा

सारे राखूया आदर।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational