५२आठवडे स्पर्धेसाठी कविता
५२आठवडे स्पर्धेसाठी कविता
* माणुसकीचा स्वर्ग*
अरे माणसा माणसा
किती झाला बदल हा तुझ्यात,
कुठे गेली तुझ्यातील माणुसकी,
कुठे हरवली मनातील ओढ.
नाही उरला कसला जिव्हाळा,
कसा झालास तू इतका स्वार्थी.
बंध तोडून सर्व नात्यांचे,
कुठे हरवलीस ती आपुलकी.
फिरतोयस सैरभैर मोकाट,
नाही राहिली तुला कशाची जाण.
विसरलास तू तुझी सारी कर्तव्ये,
कसा वागतोस होऊन बेभान.
वासनेनं तुला इतकं ग्रासलंय,
की ना राहिले भान कोणत्या वयाचे.
तू वागतोस कसा तुलाच कळेना,
गुंतलायस राजकीय डावपेचात.
पछाडलंय तुला हव्यासानं
अडकलायस तू मोहात,
तुझ्या वागण्याला आता,
नाही राहिलेलं कसलं ताळतंत्र.
अरे वेड्या नको होऊ इतका,
स्वार्थी,निष्ठूर,निर्दयी.
थोडी तरी मनात ठेव जाणीव,
तुझ्या जबाबदारी अन् कर्तव्याची.
नको ठेवू गहाण तुझे अंतर्मन.
जीवापाड जप जरा
शील अन् चारित्र्य.
सुखाचा आनंद लुटण्या
फुलव धरतीवरच
माणुसकीचा स्वर्ग.
