४ राजाची किमया
४ राजाची किमया
शिव ,फुले ,शाहू आंबेडकर !
आश्रित रयतेचे , हे राजे चारं
भाग्यवान हे , महाराष्ट्र राज्य
जिथे जन्मा आले, असे वीर ! 1!
अतुलनीय चौघांचे हे कार्य !
त्यांनी घडविला , इतिहास नवा !
बहुजनांना जागे , केले त्यांनी
दिला तो जगण्याचा, अधीकार!
शिव ,फुले ,शाहू आंबेडकर !
आश्रित रयतेचे , हे राजे चारं! ! 2!
जाती पातीच्या, वलयात कधीही !
नाहि अडकले , हे महान वीर!
एकच लक्ष्य त्यांची , त्यावर नजर !
कसा होईल , वंचिताचा उद्धार!
शिव ,फु
ले ,शाहू आंबेडकर !
आश्रित रयतेचे ,हे राजे चारं! ! 3!
हक्क शब्दाची उत्पत्ती जणू !
ह्या महापुरुषामुळेच झाली !
गुलाम होता , दुबळा समाज तो!
आज करतो कामाचा, रीतसर करार !
शिव ,फुले ,शाहू आंबेडकर !
आश्रित रयतेचे , हे राजे चारं! ! 4!
शिक्षणापासून होत्या, स्त्रिया कोसोदूर!
या थोर महात्म्यांनी, घेऊन पुढाकार !
स्त्रियांसाठी उघडली ,शिक्षणाची दार !
आज सर्वच क्षत्रात, स्त्री हि आघाडीवर !
शिव ,फुले ,शाहू आंबेडकर !
आश्रित रयतेचे , हे राजे चारं! ! 5!