धरतीचा स्वर्ग
धरतीचा स्वर्ग
1 min
204
धरतीवर स्वर्ग अवतरला
मन मोहक नजारा !
रंगीबेरंगी फुलांनी बहरला
पाणथळी तळ्याचा किनारा ! १!
आकाशी रंगात उजळल्या
डोंगर रांगा दिमाखात !
पायथ्याशी फुलांचा मळा
कुणीही पडेल मोहात! २!
असा सौंदर्याचा खजाना !
बघता नयन सुखावती !
निसर्गाचं अदभूत रूप
ही विलोभनीय प्रकृती ! ३!