!! मेळ (एकजूट) !!
!! मेळ (एकजूट) !!

1 min

45
मेळ हे दोन मुळाक्षर !
पण केव्हढी त्यात धार !
मेळ एकजुटीचा विचार ! १!
मेळ जशी गोड साखर !
मिळून खान्याची भाकर !
मेळ एकमेकांचा आधार ! २!
मेळ एक दुसऱ्याचा भार !
ताण नाही येत एकावर !
मेळ होता म्हणून जमलं सार ! ३!
मेळ म्हणजे एक शिष्टाचार !
नात्याचे बंध घट्ट बांधणार !
आपुलकीचा तो अविष्कार! ४!
मेळ जसा, गाणी सुमधुर !
साथ संगीताचा आला बहर !
अनेक आवाजाचा एकच सुर ! ५!
मेळा मुळे बळ मिळत खरं !
खुली होतात हृदयाची दार!
संकृती त्याच घरात वसणार ! ६!