Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Akash Wankhede

Others


3  

Akash Wankhede

Others


मी अजून हरलो नाही

मी अजून हरलो नाही

1 min 224 1 min 224

मी अजून हरलो नाही, थोडा घाबरलो नक्की आहे ! 

ही स्थिती बदलायला, वेळ थोडा जाणार आहे ! 


जे होत थोड जवळ , त्यानं ठीक ठाक निभावलं ! 

थोड आहे बाकी , ते पण आता संपणार आहे!  

ही स्थिती बदलायला, वेळ थोडा जाणार आहे  !!१!! 


कुणास ठाऊक असं , किती दिवस चालणार आहे ! 

एव्हढं मात्र नक्की , भूकमारी अफाट वाढणार आहे !

ही स्थिती बदलायला , वेळ थोडा जाणार आहे !! २!! 


सद्यस्थिती बघता देश , दोन दशकं मागे जाईल ! 

पुन्हा उभारी घेण्यासाठी , पुढचं एक दशक लागणार आहे!

ही स्थिती बदलायला , वेळ थोडा जाणार आहे !! ३!! 


तरी सुद्धा ..... !! मी अजून हरलो नाही , पण थोडा घाबरलो नक्की आहे! 

ही स्थिती बदलायला , वेळ थोडा जाणार आहे ! 


Rate this content
Log in