माझ्या महाराष्ट्राची व्यथा
माझ्या महाराष्ट्राची व्यथा
महाराष्ट्र माझा
विविधतेने नटलेला
सुख संपत्तीने
विपुल असलेला
लागली दृष्ट
कोणाची कळेना
माणूसपण हरवलं
स्वार्थीपणा सुटेना
माणसाने गाठला
कळस प्रगतीचा
विसरून गेला
पाया संस्काराचा
शृंगार केला
विदेशी नट्टा - पट्टा
चढवूनी मुखवटा
चारित्र्याला बट्टा
माझ्या महाराष्ट्राची व्यथा
वर्णावी किती?
टाक बदलूनी सारी परिस्थिती
मग कशाला कुणाची भिती?