हरामी
हरामी
बोलाचीच कढी, बोलाचीच भात ।
हरामीच आम्ही सारे एकजात ।।धृ।।
मतांची मागूनी भिक्षा एकदाच ।
लुटूनी देशाला खातो वर्षे पाच ।।
मते देणाऱ्यांना काय ती किंमत
हरामीच.............. ।। १ ।।
गुराढोरांचा ना चाराही सोडीला ।
गुन्हेगारांशीही संबंध जोडीला ।।
घातपातातही आमुचाच हात
हरामीच.............।।२।।
देशविकासाशी आम्हा काय घेणे?
ठावे आम्हा एकच नित्याचे चरणे ।।
मिळे खाया तेथे ना घेऊ उसंत
हरामीच.............।।३।।
देवालाही आम्ही वेठीला धरिले।
खेळणे धर्माचे आम्ही बनविले ।।
लढा तुम्ही, आम्ही राहू दिमाखात
हरामीच...…...........।।४।।
शिक्षणाचे आम्ही केले तीनतेरा ।
नितीमूल्यांचाही केला बोजवारा ।।
शुचिर्भूत आम्ही गुंतू वासनेत
हरामीच................।।५।।
म्हणू आम्ही, "मेरा भारत महान"।
स्वार्थापायी ठेवू त्यालाही गहाण ।।
धंदा अमुचा हा असे पिढीजात
हरामीच आम्ही सारे एकजात ।।६।।