भास…
भास…
इथे तिथे कोणी नसे,
तरीही दिसे कोणी कसे,
ध्यानी मनी असे कोणी,
तोच भास असे नयनी,
तान एक वारयाची,
घुमत राही अवती भवती,
लकेर पुष्प गंधाची,
दरवळते आसमंती,
इथे तिथे कोणी नसे,
तरीही दिसे कोणी कसे,
निळ्याशार पाण्यातल्या,
हळुवार कम्पनातुनी,
आकाशी चमचमत्या,
मंद मंद तार्यातुनी,
श्रIवणातून बरसणाऱ्या,
रिमझिमत्या सरीतूनी,
अन पतंगाच्या,
नानाविध रंगातुनी,
इथे तिथे कोणी नसे,
तरीही दिसे कोणी कसे,