STORYMIRROR

Surekha Lone

Abstract Inspirational Others

3  

Surekha Lone

Abstract Inspirational Others

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
252

माझी माय मराठी

घरा घरात वसलेली 

माझी माय मराठी 

शब्दात गुंफलेली....... 

               

माझी माय मराठी

नात्यात दडलेली

र्‍हदयाच्या कोपर्‍यात 

जाऊन भिडलेली....... 


माझी माय मराठी 

संतात वसलेली 

पुन्हा नव्याने ती 

साहित्यात उतरलेली.... 


माझी माय मराठी 

बालपणात नटलेली

बोबड्या सुमधूर 

सुरात हसलेली..... 


माझी माय मराठी 

जात्यावर गायिलेली

शब्द शृंगाराच्याा सुरांनी 

कवेत घेतलेली......... 


कथा, काव्य, कादंंबरीतून

नसा नसात भिडलेली

काना ऊकार वेलाांटीने 

सदैव सजलेली.......... 


डोंगरदऱ्यात नदीनाल्यात 

खळखळुन वाहिलली

 शेतातील पिके डोलताना 

सदा बहरलेली............... 


प्रेम सुखदुःख 

स्वछंद पाहिलेली 

माझी माय मराठी 

चिंब भिजलेली......... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract