परतीचा प्रवास
परतीचा प्रवास


दिवसभर तळपत राहिला
अन् सायंकाळी निघाला परतीच्या प्रवासाला
निरभ्र आकाशी रंगीबेरंगी छटा झळकुन
जणू बेरंगी चित्रांमध्ये रंग भरून
वास्तवाचे चटके सहन करण्याची क्षमता देऊन
चटक्यांवर स्नेहाची फुंकर ही घालून
पाखरांना घरट्याची वाट दावून
प्रकाशाचा विरह हसत हसत सहन करून
तीमिराशी गट्टी करून धडे गिरवून जगण्याचे
त्याचा निश्चय दृढ करून
तो निघाला परतीच्या प्रवासाला निरोप घेऊन
पुन्हा सोनेरी पहाट उजाडायला
नव्याने आशेची किरणे घेऊन
पुन्हा जगण्यासाठी...परतण्यासाठी...