तिचा अखंड परिपाठ
तिचा अखंड परिपाठ
1 min
47
एक चिमणी
जीव तिचा कासावीस
चिव चिव करी सांगायास काही
लोक समजती काही त्यास
जरी इवलासा जीव
खटपट करी जगण्यास
काडी काडी वेचते
एक खोपा बांधण्यास
भिरभिर उडते उन्हात
चिमुकल्यांना खाऊ आणायास
मोती मोती टिपते
तिची इवलीशी आस
तिचा अखंड परिपाठ
नसे रविवार आरामास
पाऊल रोजचे तिचे
आयुष्य सुरेख करण्यास
इवलेसे पंख तिचे
तीचा रोज चा प्रवास
एकवटते सारे बळ पंखात
आसमंत सामावण्यास...
