एक रम्य सांज
एक रम्य सांज
एक रम्य सांज एक रिकामा बाक
हवेचा गारवा न पानांचा सळसळाट
किलबिल पाखरांची कानी पडता
धुंद सारे काही वाटत होते
पण शेवटी सळसळाट व किलबिल च ती
अधीर मन दोघांनीही होते
त्या बाकावर मी बराच वेळ बसले होते
आठवणी चे वेल माझे ही फुलले होते
पण शेवटी फुलापरी आठवणीच त्या
गळती दोघांची ही होते..
नजर माझी डोंगरा पलिकडे भिरभिरत होती
स्वप्नातल्या गावी भरकटत होती
पण शेवटी डोंगरापरी स्वप्नच ती
उंची दोघांनीही गाठली होती
अल्पशा वेळेसाठी का होईना
आभाळ माझ्या स्वप्नांच निरभ्र वाटले
बाहेर पडता या दुनियेतून ऊन कडाक्याचं भासले
पण शेवटी अभाळापरी स्वप्नांची दुनियाच ती
काळोखाचे मेघ त्यात ही दाटले
ती वेल येईल पुन्हा बहरून
पालवी फुटून मिटेल फांद्यांची तहान
आशेची फुले ओंजळ भरुन वाहतील
शेवटी फुलापरी आशाच त्या
माळ बनुनी पुन्हा एकदा सजतील...
