STORYMIRROR

Ankit Navghare

Abstract Tragedy

3  

Ankit Navghare

Abstract Tragedy

आज कुठे

आज कुठे

1 min
11.8K

गर्दी लोकांची शोधतो मी त्यात

मिळते का क्षणभर एकांत कुठे


चालतो कल्लोळ भावनांचा मी

शोधतो मिळतो का निवांत कुठे


सदा घोंघावत दुष्ट वारा तो मग

कधीतरी होईल का शांत कुठे 


दुनियेत या जगण्याची ठरवलेली 

चौकट पण त्याची मला भ्रांत कुठे


माझ्यातून कवितेचा की कवितेतून 

माझा झालेला हा मग उत्क्रांत कुठे 


हरविला माझ्यातला मी, शोधतोय

सारीकडे तो मिळतो का आज कुठे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract