वर्षा-कविता
वर्षा-कविता


काळे नभ आकाशात
झुंजती एकमेकांत
होई त्यांच्यात भांडण
गुरगुरायचे आपसात
वारा येई भांडण सोडविण्यास
कोणी कुणाचे ऐकेनात
कितीही समजावले त्यांना
मेळ बसेना एकमेकांत
पाखरांचे थवे ऐके भांडण
सख्या रक्तांच्या काळजांची
येइना कुणा दया माया
मारामारी चाले एकमेकांची
त्यातून घडला विनाश
पडला त्यातून धरतीवर
झाला कडकडाट सृष्टीवर
फाटले धरतीचे उदर
होई आग, आग जीवाची
आक्रोश झाला धरतीचा
विनाश झाला माणसांचा
डोंगर कोसळला दुख:चा
आली कीव त्या ढगांना
पाणी पाजले धरतीला
झाले सर्व सुखी जीव
आनंद देण्यास जगाला
अशी असावी ही माया
देह दुसऱ्यांसाठी झिजवावा
मनात असावा निर्मळ विचार
सुविचार, सत्संगांमध्ये दिसावा