आयुष्य माझे
आयुष्य माझे
सकाळी चुस्की घेवूनी चहाचे
करितो विचार मी लाखाचे
प्रश्न आहेत ढिगभर यात
तरीही मी पोहोचलो नाही उत्तरात
आयुष्य माझे असेच जगतो मी
ज्यात नाही कोणता तणाव ना चिंता सारी
आहे फक्त हसू आणि शिकूची यारी
दिवसभर करुनी विचार कथेचा
लाभतो संध्याला सहवास निसर्गाचा
शांत त्या होतो वातावरणात
जातो मी उत्तरात...
मार्ग प्रश्नांचा मला सापडतो
माझा गोंधळच नेहमी मला अडतो
असते उत्तर मजपाशी
पण मला ते दिसत कसे नाही?
हा पडतो प्रश्न सदा
पण त्याचीही असते एक वेगळी अदा
जोपर्यंत प्रश्न करीत आहेत संचार
मस्तकात माझ्या
तोपर्यंत उत्तर जिज्ञासा उत्पन्न होते माझी
अन् नंतर नाहीच प्रश्न पडले तर
आयुष्यात नर्काचा भासही होतो
हा हे आयुष्य आहे माझे..
थोडे नमकीन पण चटपटीत खाजे
आयुष्यात या करायचेय खूप काही मला
अडत असेल तर संपवून टाकायचेय अभिमानाला
साहीत्यासाठी वेडा माणूस मी
नसेल साहीत्य तर जिवंतपणीच मरतो मी
पण सध्या तरी नाही तसे
अन् साहीत्याविना मला दुसरे काहीच न दिसे
हा हे असेच आयुष्य आहे माझे
जे शब्दात सांगणे आहे कठीन
करीतो मी ते तुझ्या स्वाधीन
नाही भविष्य हाती माझ्या नव्हता भूतही कधीच
आत्तापर्यंतच्या घटनांना
जबाबदार आहे मीच
हे मान्य मी करीतो
खरच या आयुष्यात माझ्या
मी असेच जगतो