हे जग माझे झाले......
हे जग माझे झाले......


ना कधी मी हरले
ना कधी मी भावनांना अडवले
मनातल्या शहरांना थांबवून
माझ्याकडून पाणी नाही आटले
ना कधी मी खिल्ली उडवत हसले
ना कधी मी माझ्या हर्षाला कपटाचे नाव दिले
या माझ्या मुखवट्याला मनातून
निखळ हसतानाचे ठसे उमटवून दिले
हे जग माझे झाले
चांगले क्रूर कृत्याला मागे सारले
माफीच्या वंदनाने पश्चातापाला दर्शवले
तर एक स्मित हास्याने आपुलकीचे
आपलेपणाचे नाते जोडले
असे माझे जग झाले
असे माझे जग झाले