राजकारण
राजकारण
"राजकारण…" किती साधा आणि सरळ शब्द आहे…
पण याचा नेमका अर्थ सांगायला…
शब्दकोशही निशब्द आहे…
कसाही पाहिला तरी…
हा शब्द नकोसा आहे…
पिढ्यान पिढ्या चालत आलंय…
म्हणे याचा इतिहास खूप मोठा आहे…
जमेल तिथे मूळं रोवत आलंय…
याचा पसारा फार मोठा आहे…
कधी सत्तेसाठी कधी पैशासाठी…
तर कधी जनतेसाठी …
राजकारण खेळलं जातंय…
इथे काय चालू आहे याचे कोणाला भानच नाहिये.
राजकारणात काय मिळालं काय गमावलं… याचं गणितच निराळ असतं…
आई-बाप, काका-मामा… इथे कोणीच कोणाचा नसतो…
एकट्यानेच जगतात सगळे… इथे जिवाभावाचा कोणीच नसतो…
राजकारण म्हणजे आहेत नाण्याच्या दोन बाजू
राजकारण कसं खेळावं… याला कुठलेच नियम का नसु…
निवडणूका आल्या जवळ की टीकास्त्र होते सुरू...
एखाद्याचे वक्तव्य पकडून tv वर होतात debate shows सुरू..
बुद्धिबळाचा हा खेळ…
यातलं कोडं कधीच सुटत नाही…
माणसं अशीही वागू शकतात… हेच आमच्या मनाला पटत नाही…
चांगला हेतू चांगले विचार… इथल्या जगाला मानवत नाहीत…
इतरांना होणाऱ्या पिडा… यांच्या कठोर मनाला जाणवतच नाहीत…
राजकारण करायला… कुठलंही कारण लागत नाही…
दगडाचं कठीण मन हवं… मग डिग्री सुद्धा कुणी मागत नाही…
राजकारण म्हणजे चिखल अशी मान्यता…
याच्यावर लागलेला हा कलंक कसा बर साफ करावा
म्हणूनच वाटतं…' जनहित में जारी' यासाठी काहीतरी कराव…
राजकारण सगळ्यांना हवहवसं वाटवून द्यावं…
अन् दूर जाणारं आमचं पाऊल…
स्वतःहून या राजकारणाकडे वळावं…