एकांत
एकांत
1 min
264
एकांत एकांत एकांत...वाटतो जरा नकारार्थी ,
पण जवळून बघितले तर सकारार्थी होण्यास वेळ लागत नाही...॥
एकांताच्या अनेक व्याख्या...कोणी म्हणतं एकटा तर कोणी म्हणतं हसरा,
पण मला वाटतो मनाची कळी खुलवणारा...॥
एकांत म्हणजे काहींना वाटतात नाण्याच्या दोन बाजू...
पण वेळोवेळी मनाच्या अथांग आकाशाला कवेत घेणे, ती असते एकांताची जादू...॥
एकांताचे अनेक क्षण....कधी असतो गर्दीत तर कधी मनाच्या एका खोलीत,
कारण स्वप्नांच्या दुनियेची दारं उघडून काव्यरचना करवून घेतो....
हा एकांत कधी कधी असतो क्षणिक...॥
