एक कवी
एक कवी
समुद्राला पाणी हवं
खलाशाला होडी हवी
कुणाला बंगला हवा
कुणाला गाडी हवी
रंगबेरंगी फुलांना
लहानशी बाग हवी
स्वयंपाकघरात चूल
चुलीत मग आग हवी
आणि प्रत्येक सासुला
घरी एक तरी सून हवी
शेतात पिकासाठी पाऊस
आणि थोडीतरी ऊन्हं हवी
सूर्यासाठी दिवस हवा
चंद्राला पण रात हवी
अंधार रात्री आकाशात
चांदण्याची साथ हवी
काही वेड्यांना धर्म हवा
मग धर्माला जात हवी
मंदिरात दिवा त्यात
जळणारी वात हवी
त्या स्मशानालाही काय
फक्तच ती मृतदेह हवी
त्यातली काही जुनी
की असोत मग नवी
कुठेतरी क्षणभरासाठी
विसावा शोधतो हा कवी
ओंजळभर पाण्यात या
समजतो तो स्वतःला रवी