मला भास झाला
मला भास झाला


कोमजलेली सारी फुले होती
त्यांना कसला आज वास आला
रात्र होती अजुनतरी पण त्यात
मला उजाडल्याचा भास झाला
एरवी बरं चालत सारं पण आता
शब्दांशी खेळण्याचा त्रास आला
का वेळेआधी तो सुर्य अस्ताला
गेल्याचा आज मला भास झाला
विचार केला कि रोजचेच काम
त्यात कसला तो ध्यास आला
पण आज भावना चोरीला
गेल्याचा मला भास झाला
का बर माझ्या कवितांच्या
नशिबी हा गळफास आला
का माझ्यातला मी संपल्याचा
आज अचानक मला भास झाला
हे वाईट स्वप्न होते एक कळले
तेव्हा श्वासात माझ्या श्वास आला
मन म्हणाले कर अजुन कविता
त्यात कसला रे तुला त्रास आला