ह्रदयाच मन
ह्रदयाच मन
मनाचा माझा उंबरा का तु ओलांडला.
ह्रदयात पाऊलखुणा उमटवुन सहज विसावला.
स्वप्नपूर्ती झाली मनाची प्रिये तुझ्या येण्याने.
ह्रदयाला पण स्पंदने झाली भावनेच्या स्पर्शाने.
तळमळलेला जीव सुखवला जरी,
विराहाचे बोल का तुझ्या मनी.
मोह झाला आता, विरह तर येणारच.
मनाच्या कटघेऱ्यात ह्रदय उभा असणारच.
पवित्र अशा प्राणाला मनाचा विठाळ असतो.
मनाच्या लहरी स्वभावाने ह्रदयच हताश बसतो.
उनाड मनात विचारांच्या पावसात,
साठवुन सार मनात, ओकतो सारं ह्रदयात.
ह्रदयाचही मन असतच ना.
मनाचही मन असतच ना.
कोणास ठाऊक केव्हा कळेल हे एकमेकांना.
तेव्हा प्राण असेल नसेल हेच उमगत नाही ह्या लोकांना.