STORYMIRROR

Navjeet Dahale

Others

3  

Navjeet Dahale

Others

आत्महत्या

आत्महत्या

1 min
11.4K

 हो आहे मी कायर,

आहेत माझ्या हि आठवणी,

बंद खोलीच्या आत दिसतो खरा माझा मी.

 

एकटा पडलेला आणि अस्वस्थ निजलेला, 

कधी पहिला का कोणी पाण्यात मासा रडलेला.


तळमळत तडफडत देह माझा, 

शेवटचा श्वास घेतला तेव्हा जरी,

आधी आत्माच जाळला तुम्ही,

आणि कुतुहलाने बोलत सुटले आत्महत्या केली यानी.


पंख छाटून माझे झेपच अडवली,

भयान अश्या निद्रेसाठी वाट नव्हती निवडली.


स्वप्नच नव्हती उरली काही, झोपच नव्हती डोळ्याला.

माये हक्काची खोटी माणसे दिसलीच कधी जिव्हाळ्याला ?


हि चूक आहे मार्ग नाही,

मान्य आहे सर्व काही.

देहातुन तर सुटलो, पण नरकात माझी सुटका नाही.


आनंदाचा खोटा सोंग माझा मलाच भोवला,

प्राण गमावून चूकवली किंमत, माझा देवच रुसला.


अपूर्णच वाटतील या ओळी,

चूक झाली माझी, आई फाडली तुझी मायेची चोळी.


Rate this content
Log in