नातं
नातं

1 min

12.2K
खुप काही हरवलयं आणि मन सार एकट झालयं,
आलोय पुन्हा एका वाटेवर,
वाटलं नव्हत भेट होईल तुझी.
मलाच माझी नव्याने ओळख झाली नवी.
तुझ्या जगात तु होती, आणि माझ्या जगात मी
बोलत गेलो, वाट सरत गेली.
कळलचं नाही या नवीन जगात आलो कसा मी!
साथ तुझी अशीच ठेव, हात माझ्या हातात देऊन,
स्पर्श हा खऱ्यापणाचा अनुभवेल तुला मिठीत घेऊन.
Advertisement
माझ्या मनातली तु आणि तुझ्या मनातला मी,
यावर जग बोलेल रोमियो जुलियेटचं जणू.
प्रेमात काय खरं आणि काय खोटं,
शेवटी प्रेम हे प्रेमच जणू.
नाही त्याला उपमा कशाची
नाही त्याचं मूल्यमापन.
नाही असा शब्द कोणता,
जो करेल त्याची पाठ राखण.