राजकारण
राजकारण


कधीही न संपणारा भेद,
आज त्यांना अभेद वाटतोय,
स्वार्थाशिवाय म्हणे लोकांना एक यायचंय.
काल तर जात होती ना तुमची,
उच्च निच्छ तुम्ही पाळलचं नाही असं म्हणताय,
दूरवर खोटा प्रकाश टाकून,
अंधारावर ही अंधार करताय.
राजकारण हमखास करा,
&nbs
p; स्वार्थासाठी खोटा विरोध करा,
पण मातीशी नकली इमान ठेवण्याऱ्यांनो,
मानुसकी वर तरी गालबोट टाळा.
शूरवीर असुनही कर्णाचा तुम्ही बळी घेतला,
त्याचा दानशुरतेचा गैरफायदा घेऊन.
तुम्ही तुमचा राजचं थाटला.
संसदेतच काय अगदी घरात देखील हेच असत,
वंशाला दिवाच पाहिजे,
पणती येऊन काय टेंबा लावेल हेच तर भिनलेल असत.
हे लोक जग काय, अगदी स्वतःला संपवतील,
पण राजकारण ते तर अजर अमर करून नक्कीच सोडतील.