STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

4  

SANJAY SALVI

Others

पुन्हा बालपण

पुन्हा बालपण

1 min
452

आज वाटते पुन्हा एकदा लहान व्हावे,

बोट पकडुनी दादाचे त्या शाळेत जावे,

तोच फळा खडू तेच गुरुजन दिसती कारे,

त्याच मैत्रिणी तेच सवंगडी आठवते मज सारे सारे,

जाता जाता रस्त्यावरचे दगड उडवूया,

पतंग नभीचा खाली येता धावत पकडूया,

बाल कवींच्या गवत फुलाला पुन्हा भेटूया,

साळून्कीला दाणा-चारा गुपचूप देऊया,

लपलपी अन पकडापकडी  सारे खेळूया,

सायंकाळी शुभंकरोती आज म्हणूया,

आई हाताचा गोड दही भात मग खाऊया,

परी कथा न भुतांच्या गोष्टी जमून ऐकुया,

असे रम्य ते मस्त बालपण पुन्हा जगूया,

चला दोस्तहो, पुन्हा एकदा बाल होऊया !!


Rate this content
Log in