समाज
समाज
मनुष्य म्हणे समाजप्रिय.......
हेवेदावे-भांडातंटायला हवा का समाज?
की,दाखवायला हवाय पैशांचा माज.
मनुष्य म्हणे समाजप्रिय,
कुलंगड्या करून भ्रष्टाचाराने
खा-खा पैसा खाऊन
गळ्याशी आलं की परदेशात राहतात जाऊन.
समाज हवा का करायला झुंडबाजी?
राजकारणी गुंडांची हॉंजी हॉंजी.
फायद्याचं बघताना अटतो समाज,
धार्मिक गटांमधे वाटतो समाज.
एक एक माणसाचा उत्कर्ष सांधून
प्रगल्भ समाज काढू बांधून.
