जीवाभावाची सखी
जीवाभावाची सखी
सखी माझी जीवाभावाची
अगदी शेजारी रहाणारी
गोड गोड गुपितांबरोबर
आवळे चिंचा बोरे देणारी
बालपणीची भातुकली
अजूनही मनी रुणझुणे
चवदार पदार्थ करुनी
सर्वांना प्रेमभरे वाटणे
बरोबरीने सखीसवे अभ्यास
आवडीने रात्री जागून केला
गुण मिळता हर्षित होऊनी
सखीसवे मेघनाद केला
शाळा काँलेजचे दिन कसे
फुलपाखरासारखे स्वच्छंदी
उडून गेले कापरासारखे
नोकरीच्या मिळाल्या संधी
यथावकाश लग्नकार्ये होता
दूर दूर सखे विखरुन गेलो
फोन मात्र सखीला नित्यनेमे
कधीही मैत्री नाही विसरलो
संकटकाळी धावून येई
प्राणप्रिय मैत्रीण माझी
अडचणी त्वरित दूर करोनी
मायेने सावरी जीवलग सखी
फोनवर नेहमी बोलताना
दोघींचेही डोळे पाणावती
तेवढीच मैत्रीणीची दृष्टभेट
दोघींची मने अतीव सुखावती
