विरह
विरह
आज परत तो सूर्यास्त पाहिला,
त्याच आठवणीच्या हिंदोळ्यावर घेऊन गेला
ते क्षण प्रेमाचे आठवून गेले,
परत विरह दुख देउन गेले
ती संध्याकाळ,ते सोबत घालवलेले क्षण,
हळूच डोळ्या पुढून तरळून गेले
तुझी जाणारी आकृती परत पाणी भरल्या डोळ्यातून धूसर झाली
ती संध्याकाळ परत विरह दुख देऊन गेली

