मैत्री
मैत्री
1 min
444
एक नाव, आयुष्यभर सोबत करते अस,
एक गाव जिथे असते कायम तुम्च्या साठी छाव.
एक हात नेहमी साथ देणारा.
एक वेळ सुखात नाही पण दुखात नक्की सावरणारा.
एक खान्दा जिथे टेकून तुम्ही मन मोकळे रडू शकता,
एक आसरा जिथे शेवटचे क्षण जगू शकता.
एक नात जे अपेक्षा ठेवत नाही,
तुम्हाला कधी जज करत नाही.
पण खरी मैत्री कळते असे किती हो लोक असतात?
आजकाल तर गल्लोगल्ली खोटे मित्र फिरत असतात.
मैत्री च्या नावाचा खेळ खन्डोबा झाला आहे,
खर कोण खोट कोण ओळखण मुश्किल झाल आहे.
मैत्री या शब्दाची आता वाटते मला भिती,
नको ते मृगजळ, आपलीच माती खोटी.
