प्रीतीचा बहर
प्रीतीचा बहर
चांदराती आला
प्रीतीला बहर
हरपले देहभान
दुमदुमला प्रीतीचा गजर
मी घेता हाती हात
तू अलगद जवळी आली
तुझ्या श्वासासारखी अविरत
ही मुकी वाणी फुलु लागली
तुझं अबोल मन
आज किती बोलकं झालं
तुझ्या मोहक शब्दांवर
हे मन फिदा झालं
अशीच कर शब्दांची बरसात
हीच माझी विनवणी
अनमोल हिऱ्यासारखे
सदैव जपेल तुला मनी